नीरू बाजवा हे पंजाबी इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. नीरू परदेशात राहते. दिग्दर्शन आणि निर्मितीमध्येही ती खूप सक्रिय आहे.
नीरूला तीन मुली आहेत, ज्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यास ती प्राधान्य देते.
नीरू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्टपणे दिसतोय. तरीही, हसत हसत तिने फोटो क्लिक केले आहेत.
फोटोंच्या कॅप्शनमध्ये नीरूने लिहिले आहे, 'ती हिऱ्यासारखी चमकतआहे. तिला कसलीच चिंता नाही'
मात्र, जेव्हा चाहत्यांनी नीरूचे हे फोटो पाहिले तेव्हा ते थोडे नाराज झाले. अभिनेत्रीची काळजी वाटू लागली.
एका चाहत्याने लिहिले की, आम्हाला माहित आहे की तुम्हाला तीन मुली आहेत, पण तुम्ही तुमचीही काळजी घ्या.
आणखी एका चाहत्याने लिहिले, चेहऱ्यावर हास्य नक्कीच आहे, पण तुमचे डोळे थकलेले दिसत आहेत.
नीरू बाजवा ही एक पंजाबी अभिनेत्री आहे. सध्या ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.