मैदा, मीठ व थोडं तेल मिसळून थोडंसं घट्टसर पाणी घालून कणिक मळून २० मिनिटे झाकून ठेवा.
Picture Credit: Pinterest
कोबी, गाजर, कांदा, आले-लसूण बारीक चिरून त्यात सोया सॉस, मीठ, मिरी घालून मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
मळलेली कणिक लाटून त्यात स्टफिंग भरून मोमोच्या आकारात बनवा. स्टीमरमध्ये १०-१५ मिनिटं वाफवून घ्या.
Picture Credit: Pinterest
सुक्या लाल मिरच्या, टोमॅटो, लसूण, आले थोडं तेल घालून भाजून घ्या.
Picture Credit: Pinterest
तीळ आणि मेथी दाणे वेगळे कोरडे भाजून घ्या आणि थंड झाल्यावर वाटा.
Picture Credit: Pinterest
भाजलेले टोमॅटो, मिरच्या, तीळ-मेथी, मीठ, लिंबाचा रस, थोडं पाणी घालून झणझणीत झोल तयार करा.
गरमागरम वाफवलेले मोमोज एका बाऊलमध्ये ठेवा आणि त्यावर झोल ओता, कोथिंबीर आणि चिली ऑइल घालून सजवा.