नेटफ्लिक्सने आज एक मोठा निर्णय जाहीर केलाय. नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंग बंद केलंय.

जगभरातील सुमारे दहा कोटी नेटफ्लिक्स युजर्स आपला पासवर्ड इतरांसोबत शेअर करतात.

यामुळे कंपनीचं नुकसान होत असून, नवीन टीव्ही सीरीज किंवा फिल्म बनवण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

नेटफ्लिक्स युजर्सना ईमेल करून कळवण्यात आलंय की त्यांचं अकाउंट फक्त त्यांच्यासाठी आणि त्यांच्या घरातल्या सदस्यांसाठी आहे.

घरी असताना, बाहेर असताना, सुट्टीवर असताना ते कुठेही असले तरी कुटुंबातील सदस्य नेटफ्लिक्स वापरू शकतात.

एकच अकाउंट एकापेक्षा अधिक डिव्हाईसेसवर वापरणाऱ्या युजर्सना ईमेल पाठवण्यात आला आहे.

कुटुंबीयांव्यतिरिक्त दुसरी व्यक्ती जर सारखंच अकाउंट वापरत असेल, तर त्याची प्रोफाईल रिमूव्ह केली जाईल.

कंपनी आता युजर्स कोणकोणत्या डिव्हाईसेसवर लॉग-इन करतायत हे तपासत आहे.

एक अकाउंट एकाच कुटुंबातील सदस्य वापरत आहेत हे निश्चित करण्यासाठी नेटफ्लिक्स व्हेरिफिकेशन कोड, प्रायमरी लोकेशनवरील वायफाय अ‍ॅक्सेस असे फीचर्स लाँच करू शकते.