निपाह व्हायरस हा प्राणघातक विषाणू आहे. त्याचा संसर्ग प्राण्यांपासून माणसांना होतो.
निपाह विषाणू संक्रमित प्राण्यांच्या विष्ठा, लघवी आणि लाळेच्या संपर्कातून मानवामध्ये पसरतो.
निपाह विषाणूचा प्रादुर्भाव आशियातील काही भागात दिसून येत आहे. भारतातही लागण होताना दिसत आहे.
निपाह व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर 04-14 दिवसांत लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
डोकेदुखीसोबतच खूप तापही येतो. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
निपाह व्हायरसची लागण झालेली असल्यास श्वास घेण्यासही त्रास होतो, थकवा जाणवतो.
स्नायू दुखण्यासारख्या समस्या उद्भवू लागतात. याशिवाय उलट्या आणि जुलाबही होऊ शकतात.
निपाह व्हायरस गंभीर झाल्यास, व्यक्ती बेशुद्ध पडू शकते. अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.