भारतातील एक पाणीपुरीचे दुकान जिथे महिलांना दिली जाते No Entry! जाणून घ्या काय आहे कारण

भारतात पाणीपुरी प्रत्येक शहरात कुठेही आणि कधीही उपलब्ध आहे.

पाणीपुरीची तिखट चव सगळ्यांनाच आवडते मग ती तरुण असो वा वृद्ध.

पाणीपुरी विशेषतः मुली आणि महिलांना आवडते.

पण ग्वाल्हेरमध्ये एक अनोखे दुकान आहे जिथे फक्त पुरुषांसाठीच पाणीपुरी मिळते.

या दुकानात महिलांना प्रवेशास सक्त मनाई आहे.

दुकानदाराने एका मोठ्या बॅनरवर ही नोटीस लिहिली आहे.

ग्वाल्हेरच्या कांचमील रोडवर असलेल्या या दुकानात फक्त पुरुषांसाठी पाणीपुरी विकली जाते.

या दुकानात फक्त १८ वर्षांवरील पुरुषच पाणीपुरी खाऊ शकतात.

विक्रेते गिरिराज सिंह भदोरिया यांनी सांगितले की, पाणीपुरीमध्ये वापरण्यात येणारे पाणी खास मसाले घालून तयार केले जाते.

त्यामुळे पाणीपुरीचे पाणी खूप तिखट असते, लहान मुले आणि महिलांना त्याचा तिखटपणा सहन होत नाही.

हेच कारण आहे की ते आधीच लहान मुले आणि महिलांना पाणीपुरी देण्यास नकार देतात.

त्यामुळे ग्वाल्हेरच्या या दुकानात फक्त पुरुषच पाणीपुरी खाऊ शकतात.