गिअर बदलताना गाडीला बसत नाहीत धक्के! काय आहे Dual Mass Flywheel?

Automobile

19 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

कारच्या गिअरबॉक्समध्ये एक खास पार्ट असतो, जो इंजिनमधून येणारे कंपन आणि धक्के कमी करण्यास मदत करतो. त्याला Dual Mass Flywheel म्हणतात.

Dual Mass Flywheel म्हणजे काय?

Picture Credit:pinterest

या फ्लायव्हीलमध्ये दोन स्वतंत्र भाग असतात. एक भाग इंजिनच्या क्रँकशाफ्टला जोडलेला असतो, तर दुसरा क्लच आणि गिअरबॉक्सशी संबंधित असतो.

दोन भागांची खास रचना

Picture Credit:pinterest

या दोन्ही भागांमध्ये विशेष आर्क स्प्रिंग्स आणि डॅम्पिंग यंत्रणा असते. ही रचना इंजिनमधून येणारी अचानक हालचाल नियंत्रित करते.

आत असतात खास स्प्रिंग्स

Picture Credit:pinterest

इंजिन चालू असताना निर्माण होणारी टॉर्कमधील चढ-उतार ही स्प्रिंग्स शोषून घेतात. त्यामुळे गिअरबॉक्सपर्यंत पोहोचणारे कंपन कमी होतात.

इंजिनचे कंपन कसे कमी होते?

Picture Credit:pinterest

क्लच दाबून गिअर बदलताना इंजिन आणि ट्रान्समिशनमधील जोडणी तात्पुरती बदलते. अशावेळी निर्माण होणारे टॉर्कचे धक्के Dual Mass Flywheel कमी करण्यास मदत करते.

गिअर बदलताना काय होते?

Picture Credit:pinterest

गिअर बदलताना होणारे झटके, कंपन आणि आवाज कमी होतात. त्यामुळे गाडीचा प्रवास अधिक स्मूथ आणि आरामदायी होतो.

गाडीला बसणारे धक्के कमी

Picture Credit:pinterest

विशेषतः जास्त टॉर्क असलेल्या डिझेल कार आणि काही पेट्रोल कारमध्ये Dual Mass Flywheel वापरले जाते. मात्र प्रत्येक कारमध्ये हे तंत्रज्ञान असतेच असे नाही.

कोणत्या गाड्यांमध्ये वापर?

Picture Credit:pinterest

स्टार्ट किंवा इंजिन बंद करताना खडखड आवाज, आयडलिंगमध्ये कंपन, क्लच वापरताना असामान्य आवाज आणि गिअर बदलताना झटके जाणवू शकतात.

खराब झाल्यास काय लक्षणे दिसतात?

Picture Credit:pinterest

Dual Mass Flywheel खराब झाल्यास त्याची तपासणी आणि गरजेनुसार बदल करावा लागू शकतो. त्यामुळे क्लचमधून किंवा इंजिनमधून असामान्य आवाज आल्यास दुर्लक्ष करू नका.

दुरुस्ती महाग पडू शकते?

Picture Credit:pinterest