अंकशास्त्रात अनेक गोष्टींचे अंदाज बांधण्यात आले आहेत. कोणत्या जन्मतारखेचे जोडीदार एकमेकांसाठी उत्तम असतात हे आपण जाणून घेऊयात.

अंकशास्त्रात जन्मतारखेनुसार 1 ते 9 पर्यंत मूलांक मोजला जातो. ज्यांचा जन्म 9 तारखेनंतर झालाय त्यांच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज करुन मूलांक मिळतो.

तर भाग्यांक काढण्यासाठी जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्माचं वर्ष या तिन्हीची बेरीज केली जाते.

अंकशास्त्रातील मूलांकानुसार कोणत्या जन्मतारखेचे लोक एकमेकांसाठी उत्तम जोडीदार ठरतात, हे जाणून घेऊयात.

मूलांक 1  असलेल्यांचं 2,4,6  मूलांक असलेल्यांशी चांगलं पटतं.

मूलांक 2 असलेल्यांचं 1,3,6मूलांक असलेल्यांसोबत खूप चांगलं पटतं.

मूलांक 3  असलेल्यांसाठी 2,6,9 मूलांक असलेले लोक उत्तम जोडीदीर ठरू शकतात.

मूलांक 4 असलेल्यांसाठी 1,2,7,8 मूलांक असलेले साथीदार बेस्ट असतात.

ज्यांचा मूलांक 5 आहे त्यांच्यासाठी 5,8 मूलांक असलेले जोडीदार उत्तम असतात. तर  6 मूलांक असलेल्यांच कुणासोबतही छान जमू शकतं.