‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये न घेतल्याने नुसरत भरुचा नाराज ?
‘ड्रीमगर्ल’ चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत नुसरत भरुचाने महत्त्वाची भूमिका निभावली होती.
ड्रीमगर्लचा सीक्वेल असलेल्या ‘ड्रीमगर्ल 2’ मध्ये मात्र नुसरतच्या जागी अनन्या पांडे दिसणार आहे.
‘ड्रीमगर्ल 2’ मध्ये न घेतल्यामुळे नुसरत नाराज आहे. तिने याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नुसरत म्हणते की, मला पुन्हा सिनेमात का घेतलं नाही हे मला माहित नाही. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक याचं स्पष्टीकरण देऊ शकतील.
मला कास्ट का केलं नाही ? हा प्रश्न मलाही पडलाय, असं नुसरत सांगते.
शेवटी मी पण एक माणूस आहे मला चित्रपटात न घेतल्याचं मला थोडं वाईट वाटतंय. पण निर्णय घेणं त्यांच्या हातात आहे,असंही तिने म्हटलं.
कुणालाही न दुखावता नुसरतने आपलं म्हणणं मांडलंय. याशिवाय तिने ‘ड्रीमगर्ल 2’ च्या ट्रेलरचंही कौतुक केलंय.
‘ड्रीमगर्ल 2’ मध्ये नुसरत दिसणार नसली तरी तिचा ‘अकेली’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.