पाऊस पडल्यानंतर पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढतो.

त्यामुळे डेंग्यू, मलेरियासारखे गंभीर आजर थैमान घालतात. 

अशी एक वनस्पती आहे, जी घरात लावल्यास घरात डास येणार नाहीत. 

जाणून घ्या या ओडोमास प्लांटबद्दल 

 या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे तिला दररोज पाणी देण्याची गरज नाही.

ही झाडे कमी पाण्यातही चांगली वाढतात.

त्याची पाने अंगावर लावल्यास किंवा तेल वापरल्यास डास पळून जातात.

हे रोप तुमच्या जवळच्या नर्सरीमध्येही मिळेल.

विविध ई-कॉमर्स वेबसाइट्सवर ही वनस्पती 250 ते 400 रुपयांना विकली जात आहे.