टोमॅटोच्या वाढलेल्या किमतींमुळे बाजारात अनेक प्रकारच्या ऑफर दिल्या जात आहेत.

यूपीच्या वाराणसीमधील एका टॅटू शॉपमध्ये दुकानदार टॅटू काढणाऱ्यांना एक किलो टोमॅटो फुकट देत आहे.

 या भन्नाट ऑफरचा फायदा उचलण्यासाठी महिलांमध्ये खूप उत्साह असल्याचं पाहायला मिळत आहे. 

 असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात टॅटू काढले जातात 

 यामुळेच दुकानदाराने ही भन्नाट ऑफर दिलेली आहे.

टोमॅटोचे दर गगनाला भिडलेले आहेत, त्यामुळे महिला या ऑफरचा लाभ घेत आहेत.

या ऑफरचा फायदा घेण्यासाठी  टॅटू शॉपमध्ये आल्याचे एका महिलेने सांगितले.

बिझनेस वाढवण्यासाठी दुकानदाराची नामी युक्ती.