सेन्सॉर बोर्डाने ‘ओह माय गॉड 2’ चित्रपटातील दृश्यांवर आक्षेप घेतला होता.

अमित राय दिग्दर्शित ‘ओएमजी 2’ येत्या 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.  पण हा चित्रपट फिल्म सर्टिफिकेशनच्या प्रक्रियेमध्ये अडकलाय. 

‘ओएमजी 2’ला सेन्सॉर बॉर्डाने सर्टिफिकेट देण्यापूर्वी  चित्रपट रिव्हाईजिंग कमिटीकडे पाठवला होता. 

रिव्हाईजिंग कमिटीने अक्षय कुमारच्या ‘ओएमजी  2’ या चित्रपटात तब्बल 20 कट्स सुचवलेत.

रिव्हाईजिंग कमिटी चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट देण्याच्या विचारात आहे.

चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट देण्याच्या मुद्द्यामुळे अक्षयकुमार सह निर्मात्यांचं टेन्शन वाढलंय. 

चित्रपटाच्या प्रदर्शानाची तारीख पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता  वर्तवली जातेय.

अक्षय कुमार स्टारर ‘OMG 2’ चित्रपटाची कथा केवळ धर्म आणि श्रद्धेवर आधारित नसून चित्रपटाचा मूळ विषय हा लैंगिक शिक्षण आहे. 

 धर्म आणि लैंगिक शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर बनलेल्या या चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्ड गांभीर्याने विचार  करतंय.