साऊथ स्टार प्रभासच्या 'साहो'मधील एका सीनवर मेकर्सनी सुमारे 90 कोटी रुपये खर्च केले. हा चित्रपट 2019 मध्ये आला होता.

चिरंजीवीने 2019 च्या से रा नरसिम्हा रेड्डी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील सीनसाठी शूट करण्यासाठी निर्मात्यांनी 54 कोटी रुपये खर्च केले होते.

अक्षय कुमार 'सध्या बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटाचा एक फाईट सीन 15 कोटी रुपयांमध्ये शूट करण्यात आला.

सलमान खानच्या राधे या चित्रपटातील एक सीन सुमारे 7.50 कोटी रुपयांमध्ये शूट करण्यात आला होता. 

 दाक्षिणात्य अभिनेता धनुषचा हॉलिवूड चित्रपट 'द ग्रे मॅन'च्या एका दृश्याच्या शूटिंगसाठी सुमारे 319 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

16 जून रोजी रिलीज होणाऱ्या साऊथ स्टार प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटाच्या एका सीनसाठी 12 कोटी रुपये खर्च करण्यात आले.

अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्या 2.0 चित्रपटातील एका भांडणाच्या सीनासाठी निर्मात्यांनी 20 कोटी रुपये खर्च केले होते.

 राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या आरआरआर चित्रपटाच्या महाकाव्य युद्धाच्या सीनसाठी निर्मात्यांनी 46 कोटी रुपये खर्च केले.