फिट राहण्यासाठी अनेक जण मॉर्निंग वॉकला जातात.
मात्र पावसामुळे अनेकदा बाहेर मॉर्निंग वॉकला जाणं शक्य होत नाही.
अशा वेळी तुम्ही घरीच व्यायाम करू शकता.
घरीच शारिरीक हालचाली होतील यासाठी प्रयत्न करा.
तुमच्या घरी ट्रेडमिल असेल तर त्याच्यावर चाला. त्याद्वारे तुम्ही वजन नियंत्रणात आणू शकता.
तुम्ही घरी योगासनेदेखील करु शकता.
रोज लिफ्टचा वापर न करता जिन्याच्या पायऱ्यांचा वापर करा.
घरी तुम्ही गाणं ऐकून झुंबा व्यायाम करु शकता.
स्किपिंग, हॉपिंग असे व्यायामही तुम्ही करू शकता.