ऑस्कर पुरस्कारांच्या 96 व्या सीझनमध्ये बार्बी आणि ओपेनहाइमरने वर्चस्व कायम ठेवले आहे.

नॉमिनेशनची घोषणा जॅझी बीट्स आणि जॅक क्वेड यांनी केली.

ख्रिस्तोफर नोलनचा सिनेमा ओपेनहाइमरला 13 नॉमिनेशन्स मिळाली आहेत.  

बार्बी सिनेमाला 6 नॉमिनेशन्स मिळाली आहेत.

सिलियन मर्फी, ब्रॅडली कपूर, जेफ्री राइट, पॉल गियामट्टी यांना अभिनेत्यासाठी नामांकन मिळालंय.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या यादीत लिली ग्लॅडस्टोन, एम्मा स्टोन, ऍनेट बेनिंग, कॅरी मुलिगन यांच्या नावांचा समावेश आहे.

भारतीय वंशाच्या निशा पाहुजाच्या 'टू किल अ टायगर'च्या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचरमध्ये स्थान मिळाले आहे.

यंदाच्या ऑस्कर पुरस्कारात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.