भारतात आलेल्या सीमा हैदरचे पाकिस्तानात जाण्यासाठीचे तिकीट बुक झाले आहे.
मात्र, सीमा हैदर पाकिस्तानला परत जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मेरठचे सपा नेते अभिषेक सोम यांनी सीमा हैदरवर चित्रपट बनवण्यास विरोध केला आहे.
त्याविरोधात अभिषेक सोम यांनी दिग्दर्शक अमित जानी आणि सीमा हैदरला तिकीटं पाठवली आहेत.
हे तिकीट 31 डिसेंबर 2023 चे आहे आणि ते सीमा आणि अमित यांच्या नावावर आहे.
मात्र, सीमा हैदरच्या चार मुलांची तिकीटं नाहीत. त्यामुळे आणखी एक प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रश्न असा आहे तिकीट तर booked झालं आहे, पण सीमा पाकिस्तानला जाणार का?
कारण सीमाने एकदा नाही तर अनेक वेळा पाकिस्तानला जाणार नसल्याचे सांगितले आहे.
पाकिस्तानमध्ये आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा सीमा हैदरने केला आहे.