सचिनच्या प्रेमात चार मुलांना घेऊन भारतात आलेल्या सीमा हैदरबाबत नव्या गोष्टी समोर येत आहेत.

पाकिस्तानात राहणारे त्यांचे शेजारी आणि जमीनदाराच्या मुलाचे वक्तव्य समोर आलं आहे.

त्यांनी सांगितल्यानुसार सिंध प्रांतातील (कराची) गुलिस्तान-ए-जौहरमध्ये भाड्याच्या घरात सीमा राहत होती.

घर दिसायला खूप जुनं आहे. कचरा आणि वाहत्या गटारांनी भरलेल्या अरुंद गल्लीत आहे.

जमीनदाराचा मुलगा नूर मोहम्मद याने सांगितले की, सीमा जवळपास तीन वर्षे त्यांच्यासोबत राहिली. 

"परिस्थिती पाहता सीमाच्या पतीने तिला घर घेण्यासाठी 12 लाख रुपये दिले विश्वास ठेवणे कठीण आहे."

एवढंच नाही तर नूरच्या सांगण्यानुसार, सीमाचे सासरे त्या घरापासून काही अंतरावर राहतात. मात्र, सीमा मुलांसोबत एकटीच राहत होती.

सीमा आणि गुलाम यांनी 10 वर्षांपूर्वी आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध पळून जाऊन लग्न केले होते. सध्या गुलाम सौदी अरेबियात कार्यरत आहेत.

सीमा आपल्या चार मुलांसह नोएडाला आली आहे. ती PUBG च्या माध्यमातून सचिनच्या प्रेमात पडली.

एक अशिक्षित महिला पाकिस्तानातून भारतात कशी जाऊ शकते याचे पाकिस्तानच्या लोकांनाही आश्चर्य वाटते.

सीमाच्या कागदपत्रांमध्ये आणि कथेत तफावत आहे,त्यामुळे प्रत्येक अँगलने तपास केला जात असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.