हस्तरेखा शास्त्राद्वारे एखाद्या व्यक्तीचे भविष्य सांगितले जाऊ शकते.
ज्यांच्या तळहातात राजयोग असतो ते राजासारखं आयुष्य जगतात.
शास्त्रानुसार ज्यांच्या तळहातावर गुरु पर्वतावर क्रॉस चिन्ह असते. त्यांना पैशाची कमतरता जाणवत नाही.
ज्या व्यक्तींच्या तळहातावर शुक्र पर्वत आहे. अशा लोकांवर लक्ष्मीची कृपा राहते. त्यांना अल्पावधीत यश मिळते
जेव्हा एखादी रेषा मणिबंधातून जाऊन शनी पर्वतावर जाते तेव्हा गजलक्ष्मी योग तयार होतो. या लोकांना भौतिक सुख प्राप्त होते.
चंद्ररेषा बुध पर्वताकडे सरकते तेव्हा अमला योग तयार होतो. अशा लोकांना व्यवसायात यश मिळते.
हातावर तर्जनी आणि मधल्या बोटांच्या मध्ये V चिन्ह असणे शुभ मानले जाते. विचारसरणी सकारात्मक असते.
ज्या लोकांच्या हातावर V चिन्ह आहे. त्यांचे कुटुंबीयांशी खूप चांगले संबंध असतात.