आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा विवाहबद्ध झाले आहेत.

दोघांनी स्वतः लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

राघव परिणीतीच्या कपाळावर किस घेताना दिसत आहेत.

लग्नात दोघंही सुंदर दिसत होती. परिणीतीने क्रीम रंगाचा हेवी वर्क लेहेंगा परिधान केला होता.

 अभिनेत्रीच्या ओढणीच्या मागे राघवचे नाव लिहिले होते

राघवने पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता आणि परिणीतीने क्रीम रंगाचा लेहेंगा घातला होता.

उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला. 

लग्नाची मिरवणूक वेगळ्या पद्धतीने काढण्यात आली. मिरवणूक घोड्यावर नाही बोटीवर निघाली.