‘पैचान कौन’ पंचलाईनचा जनक  15 वर्षांनी रंगभुमीवर

 'पैचान कौन' या पंचलाईनचा जनक,कॉमेडियन आणि होस्ट नवीन प्रभाकर सरप्राईज पॅकेज घेऊन आला आहे.

'कॉमेडी लाफ्टर नवीन प्रभाकर' हा नवा लाईव्ह शो चाहत्यांसाठीचं एक सरप्राईज पॅकेज आहे.

या लाईव्ह कार्यक्रमाचा आठवा खेळ नुकताच बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात पार पडला.

  ‘कॉमेडी लाफ्टर नवीन प्रभाकर' कॉमेडी शो च्या निमित्ताने नवीन प्रभाकर 15 वर्षांनी स्टँडअप कॉमेडी करतोय.

या लाईव्ह शोमध्ये नवीन प्रभाकरसोबत नितीन भांडारकर आणि राजकुमार जावकर म्हणजेच राजकुमार रँचो या स्टॅंडअप कॉमेडीयन्सचाही सहभाग आहे.

नवीन प्रभाकर शोविषयी सांगतो की, या कार्यक्रमाचे माध्यम हिंदी आहे.  पण कार्यक्रमाच्या प्रेक्षकांनुसार आम्ही कार्यक्रमाचे सादरीकरण करतो.

तो सांगतो की, मराठी प्रेक्षक असेल तर अर्धा तास मराठीतून सादरीकरण करतो. गुजराती असेल तर गुजरातीतूनच सादरीकरण करतो.

या शोमध्ये व्यंगात्मक टिप्पणी आहे. बॉलिवूड मिमिक्री, डान्स आणि चालू घडामोडींवर विनोदी पद्धतीने भाष्य आम्ही भाष्य करतो, असं तो सांगतो.

 माझा नवीन शो प्रेक्षकांसाठी फक्त हास्याची पर्वणी नसून  ताणतणाव दूर करुन मनाला शांती  देणारं पॅकेज असल्याचं नवीन प्रभाकर आवर्जून सांगतो.