भारतात पेट्रोल 15 रुपये लीटरने मिळणार ???
सध्या देशात पेट्रोलने शंभरी गाठलेली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल 15 रुपये लीटर होईल असा दावा केल्याने नागरिकांना आनंद आणि आश्चर्य वाटत आहे.
जर 60% इथेनॉल आणि 40% इलेक्ट्रिक वाहने वापरली तर पेट्रोल 15 रुपयांनी विकले जाईल असं गडकरींनी म्हटलंय.
नितीन गडकरी यांनी राजस्थानमधील प्रतापगड येथील जाहीर सभेत ही माहिती दिली
हे उद्दिष्ट साध्य झाल्यास स्वस्त पेट्रोलचे स्वप्नही पूर्ण होईल.
स्वस्त पेट्रोलचा थेट फायदा देशातील जनतेला होणार आहे.
शेतकऱ्यांनी घेतलेल्या ऊस आणि इतर पिकांपासून इथेनॉल तयार केले जाते
इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळून इंधन म्हणून वापरले जाते.
ब्राझीलमध्ये 100 टक्के गाड्या इथेनॉलवर चालतात.