भारतात 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी ITR भरण्याची अंतिम तारीख ही 31 जुलै आहे.
हीच गोष्ट लक्षात घेऊन फोन पे ने इन्कम टॅक्स भरण्यासाठी फिचर आणलंय.
फोन पे च्या फिचरद्वारे करदात्यांना आणि व्यावसायिकांना थेट self-assessment आणि अॅडव्हान्स टॅक्स भरता येणार आहे.
यामुळे टॅक्स पोर्टलवर लॉग इन करण्याची गरज निर्माण होणार नाही.
फिचर अधिक सक्षम करण्यासाठी फोन पे ने PayMate, डिजिटल B2B पेमेंट आणि सेवा प्रदाता सह भागीदारी केली आहे.
आपल्या क्रेडिट कार्ड किंवा UPI चा वापर करून सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा टॅक्स यावर भरू शकता.
महत्वाची गोष्ट म्हणजे फोन पे च्या फीचरद्वारे करदाते फक्त कर भरू शकतात. मात्र ते फाईल करू शकत नाहीत. त्यामुळे आयटीआर फाईल करण्यासाठी तिथे सांगितलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
पण या फिचरमुळे टॅक्स भरण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे.