पितृपक्षात कशाचे दान करावे, जाणून घ्या

Life style

05 September, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

यावर्षी पितपक्षाची सुरुवात रविवार, 7 सप्टेंबरपासून होत आहे. या काळात लोक त्यांच्या पूर्वजांची शांती आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी दान करतात.

पितृपक्षाची सुरुवात

असे म्हटले जाते की, पितृपक्षामध्ये दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते

दानधर्म करणे

पितृपक्षात काही गोष्टींचे दान केले जाते. यामधील एक गोष्ट आहे तीळ. जाणून घ्या तिळाच्या दानाने काय होते.

तिळाचे दान

काळ्या तिळाचे दान

पितृपक्षामध्ये पांढऱ्या तिळाचे दान करणे देखील शुभ मानले जाते. मात्र काळ्या तिळाचे दान श्रेष्ठ मानले जाते.

नक्की करा दान

जर तुम्ही कोणत्या गोष्टींचे दान करणार असाल तर ही एक गोष्ट नक्की दान करा

पूर्वजांचा आशीर्वाद

काळ्या तिळाचे दान करण्याने पित्तरांचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनात येणाऱ्या समस्या लवकर दूर होतात, असे म्हटले जाते

पितृदोष तयार होणे

जर पितरांच्या रागामुळे किंवा नाराजीमुळे पितृदोष निर्माण झाला असेल, तर श्राद्धादरम्यान सलग १६ दिवस तीळ दान केल्याने दोष नाहीसा होतो.

मोक्ष प्राप्ती

पितृपक्षात काळे तीळ दान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो.

पितरांची मुक्ती

याशिवाय हे दान केल्याने पिशाच्च स्वरूपात भटकणाऱ्या पूर्वजांना मुक्ती मिळते.