घरात झाडे लावल्याने वातावरण शुद्ध होते. यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात राहते.
आज आपण अशाच एका रोपाबद्दल सांगणार आहोत, ते घरात लावल्याने भांडणं मिटतात.
मनी प्लांटचं वास्तूशास्त्रात खूप महत्त्व सांगितलं जातं.
ट्रान्स्परंट बॉटल किंवा निळ्या रंगाच्या बॉटलमध्ये मनी प्लांटचं रोप लावता येते.
आर्थिक प्रगतीसाठी ते घराच्या उत्तर दिशेला ठेवावे आणि त्यात चांदीचे नाणे ठेवावे.
जमिनीत रोप लावत असाल तर आग्नेय दिशेला लावावे.
हे रोप वरच्या दिशेने वाढत ठेवावे, त्याची वेल खाली येऊ देऊ नये याकडे लक्ष द्या.
आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी हे रोप घराच्या मंदिरात लावावे.