पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सनंतर आता एक दिवसासाठी युएईला गेले आहेत.
पंतप्रधान मोदी यांचं युएईमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं.
जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.
बुर्ज खलिफा इमारतीवर भारताचा तिरंगा, पंतप्रधान मोदींच्या फोटोसह स्वागतासाठी खास संदेश झळकला.
बुर्ज खलिफावर 'पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत आहे' असं लिहिलं होतं.
तिरंग्याच्या रंगात ही इमारत न्हाऊन निघाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अबुधाबी येथे पोहोचले आहेत.
युएई दौऱ्यावर पंतप्रधान मोदी युएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील.
पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यामुळे भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन देशांतील संबंध अधिक दृढ होतील.