डाळिंबाच्या मदतीने घरच्या घरी त्वचेची चांगली काळजी घेऊ शकता

डाळिंबाच्या मदतीने घरच्या घरी त्वचेची चांगली काळजी घेऊ शकता

त्वचा मुलायम आणि चमकदार हवी असेल तर 'डाळिंब फेशियल' ट्राय करा

सुरुवातील सात ते आठ चमचे डाळिंबाचा रस घेऊन त्यात दहा ते पंधरा थेंब पाणी मिसळून चेहऱ्याला लावा

यामुळे चेहऱ्यावरील घाण निघून चेहरा स्वच्छ होईल

चार चमचे तांदळाचे पीठात चार चमचे डाळिंबाचा रस मिसळून घट्ट पेस्ट तयार करा आणि या पेस्टने स्क्रब करा

त्यानंतर एक चमचा दुधाच्या सायमध्ये एक चमचा डाळिंबाचा रस मिसळून चेहऱ्याला लावा

कोको पावडरमध्ये आणि डाळिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा आणि ती चेहऱ्याला लावा

डाळिंब वापरल्याने त्वचा मऊ आणि चमकदार होतेच. यामुळे त्वचेला भरपूर पोषण मिळते.