काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री पूजा सावंतने सिद्धेश चव्हाणसोबत लग्न केलं.

लग्नानंतरचा पूजा आणि सिद्धेशचा हा पहिलाच सण आहे.

पूजाने सेलिब्रेशनचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

"सर्वाना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा" पूजा सावंतने दिल्या.

पिवळी साडी, मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा असा लूक पूजाने केला होता.

तर सिद्धेशने पोपटी रंगाचा लखनवी कुर्ता वेअर केलेला होता.

पूजाने ऑस्ट्रेलियातील घरी गुढी उभारत सण साजरा केला.

पुरळपोळी, बटाट्याची भजी, वरण भात, भजी, खीर असा मेन्यू होता.