आंबा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो हापूस आंबा. मात्र, हापूस आंब्याशिवायही आंब्याचे वेगवेगळे प्रकार आहेत.

आंब्याच्या प्रत्येक जातीचा रंग, चव, आणि आकार वेगवेगळा आहे.

दशेरी ही एक रसाळ आंब्याची जात आहे. हा आंबा गोड चवीसाठी लोकप्रिय आहे.

देवगड हापूस हा आंब्यांमध्ये सर्वात लोकप्रिय आंबा. कोकणात हा आंबा पिकतो.

सफेदा हा आंबा आंध्र प्रदेशमध्ये पिकतो. या आंब्याचे वजन सुमारे 350 ग्रॅम असते.

केसर आंब्याची लागवड जुनागडमध्ये केली जाते. हा आंबा रसासाठी प्रसिद्ध आहे. 

लंगडा हीसुद्धा आंब्याची एक जात आहे. हा आंबा उत्तर प्रदेशमध्ये पिकतो

 शेरशाह सूरीने आणलेला चौसा आंबा उत्तर भारत आणि बिहारमध्ये प्रसिद्ध आहे. पिवळा चमकदार हा आंबा असतो.

सिंधुरा आंबा गोड आणि किंचित तिखट असतो आणि त्याचा सुगंध खूप चांगला येतो. 

हिमसागर हा आंबा पश्चिम बंगाल आणि ओडीसामध्ये मिळतो. गोड आणि भरपूर गर या आंब्याला असतो. त्याचे वजन 250-350 ग्रॅम आहे.

नीलम आंबा हा आंब्याच्या जातींपेक्षा लहान असतो. त्याचा रंगही नारिंगी असतो.

तोतपुरी आंबा हा मोठा असतो. त्याची सालही जाड असते. प्रामुख्याने दक्षिण भारतात या आब्याची लागवड केली जाते.