फिट राहण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर काही सवयी लावून घेणं आवश्यक आहे.

 रात्री  जेवल्यानंतर चालल्याने पचनक्रियेत सुधारणा होते. रात्री शतपावली केल्याने खाल्लेलं अन्न पचतं.

जेवण झाल्यानंतर पाणी प्यायल्याने अन्नपचन नीट होते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

रात्रीच्या जेवणानंतर गोड खावंसं वाटत असेल तर इतर काही खाण्यापेक्षा फळं खा. फळांमुळे वजन कमी व्हायला मदत होते.

जेवल्यानंतर लगेच झोपू नका. त्यामुळे पचनात अडथळे निर्माण होतात. जेवल्यावर किमान 1-2 तास तरी झोपू नका.

गरजेपुरतंच खा. काही वेळा जेवल्यानंतर आवडीचा पदार्थ दिसल्यास पुन्हा खाणं होतं, ते टाळा.

 रात्री जेवण केल्यानंतर धुम्रपान करु नका.यामुळे फुफ्फुसासह पचनक्रियेवरही परिणाम होतो. धुम्रपानाच्या सवयीने कर्करोग, हृदयविकार संभवतात.

जेवल्यानंतर दारू पिणंही घातक आहे. त्यामुळे अपचन, पोटात आणि छातीत जळजळणं अशा समस्या सुरु होतात. यकृत खराब होऊ शकतं.

फिट राहण्यासाठी या सगळ्या टिप्स नेहमी लक्षात ठेवा.