प्रभासचा आदिपुरुष सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. 

सिनेमात राघव-जानकीच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

 तर दुसरीकडे, लक्ष्मणच्या भूमिकेत असलेला सनी सिंह ट्रोल होत आहे.

सीता हरण ज्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे त्यावर प्रेक्षकांनी नाराजी दाखवली आहे. 

रामायणातील राम-रावणाच्या युद्धापुढे आदिपुरुषमधलं युद्ध बालिष वाटतं

क्रिती सेननने साकारलेली सीता प्रेक्षकांना आवडत आहे.

तरीही दीपिका चिखलिया यांनी साकारलेल्या सीतेच्या भूमिकेशी तुलना होत आहे.

देवदत्त नागेच्या हनुमानाची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली आहे.

प्रभासच्या चेहऱ्यावर प्रभू श्रीरामांचं तेज दिसत नसल्याचं प्रेक्षकांचं मत आहे.

सैफ अली खानचा रावण प्रेक्षकांना भावलेला नाही, तो ट्रोल होत आहे.

 सिनेमात VFX चा भडीमार असल्याचंही काही प्रेक्षकांनी म्हटलं आहे. 

आदिपुरुष सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही

तरीही पहिल्या दिवशी हा सिनेमा धमाकेदार कमाई करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.