ओम राऊत दिग्दर्शित
'आदिपुरुष' हा
सिनेमा 16 जूनला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
या सिनेमाशी संबंधित अशा बातम्या समोर आल्या आहेत, ज्या ऐकून तुम्हाला विचित्र वाटेल.
'आदिपुरुष' च्या टीमने जाहीर केले आहे की सिनेमाच्या रिलीजच्यावेळी प्रत्येक थिएटरमध्ये 'हनुमान जी' साठी एक सीट बुक केली जाईल.
निर्मात्यांनी असा निर्णय का घेतला, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.
प्रत्येक स्क्रीनिंगला एक सीट हनुमानासाठी बुक असेल, ती विकली जाणार नाही.
"जिथे रामायण पठण केले जाते, तेथे हनुमानाचे दर्शन होते. हा आमचा विश्वास आहे. या विश्वासाला मान देत हा निर्णय घेण्यात आला आहे."
'आदिपुरुष' हा सिनेमा पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे.तेलुगू,हिंदी,तमिळ,
मल्याळम आणि कन्नड
प्रभास, क्रिती सेनन, सनी सिंह, प्रमुख भूमिकेत, आणि हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागे
आदिपुरुष सिनेमाचं बजेट 500 कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे.