प्रदोष व्रताच्या दिवशी करा हे उपाय

Life style

16  October, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे. हे व्रत प्रत्येक महिन्यात दोनदा येते. महादेव आणि देवी पार्वतीला हे व्रत समर्पित आहे

प्रदोष व्रत

यावेळी प्रदोष व्रत त्रयोदशी तिथी म्हणजे धनत्रयोदशीला आहे. या दिवसापासून कुटुंबात सुख, समृद्धी आणि संपत्ती येते.

धनत्रयोदशी 2025

कधी आहे प्रदोष व्रत

कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील पहिले प्रदोष व्रत आणि ऑक्टोबर महिन्याचे शेवटचे प्रदोष व्रत शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी आहे. 

प्रदोष व्रत उपाय

यावेळी प्रदोष व्रताचे महत्त्व आणखीन वाढणार आहे. अशा वेळी काही उपाय केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी येईल.

तीळ अर्पण करा

प्रदोष व्रत म्हणजे धनत्रयोदशीला शिवलिंगावर तीळ अर्पण करा. यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे होतात आणि आनंदाचे आगमन होते

तांदूळ अर्पण करा

धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी शिवलिंगावर तांदूळ अर्पण करा

धनप्राप्तीचे योग

असे मानले जाते की, हे उपाय केल्याने आर्थिक लाभाचे योग तयार होतात आणि आर्थिक समस्येचा सामना करावा लागत नाही

गहू आणि धतुरा

प्रदोष व्रताच्या वेळी शिवलिंगावर गहू आणि धतुराने अभिषेक करा. यामुळे व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी येते.

लाल चंदन अर्पण करा

प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांना लाल चंदन अर्पण करावे. यामुळे व्यक्तीच्या कुंडलीमधील सूर्याची स्थिती मजबूत होते