प्राजक्ता माळीचा फिटनेस फंडा

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आज वाढदिवस आहे.

तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काय करते हे जाणून घेऊयात.

प्राजक्ता व्यायाम आणि आहार दोन्ही गोष्टी लक्षपूर्वक करते.

अष्टांग योगामुळे शरीर आणि मन फिट ठेवणं शक्य होतं, असं ती सांगते.

व्यायामासोबतच आहारदेखील महत्त्वाचा असल्याचं प्राजक्ता सांगते. ती सकस आहाराला प्राधान्य देते.

ती सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी पिते, त्यानंतर एक फळ खाते आणि मग दोन तासांनी पोटभर नाश्ता करते.

ती चहामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करते.

दुपारी ती एक-दोन पोळ्या, पालेभाजी, वरण भात, कडधान्य असा आहार घेते.

रोज न चुकता ती योगासनंही करते.