अभिनेता प्रथमेश परबचा साखरपुडा नुकताच पार पडला.

प्रथमेश आणि क्षितीजा घोसाळकर यांचा साखरपुडा 14 फेब्रुवारीला झाला.

'मला वेड लागले प्रेमाचे', म्हणत हे दोघंही प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत.

"आमचा व्हॅलेंटाईन डे असा साजरा झाला…इथून पुढे आयुष्यभराची साथ राहील"

प्रथमेश आणि क्षितीजाची ओळख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झाली.

साखरपुड्याच्या सोहळ्याचे काही निवडक क्षण प्रथमेशने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अभिनेत्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती, क्षितीजाने जांभळ्या रंगाची पैठणी नेसली होती.

या दोघांवर मराठी सिनेसृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.