प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर यांचा विवाह नुकताच झाला.
सोशल मी
डियावर प्रथमेशने लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत.
'Finally......Lockdown love story चे Hearts, forever साठी locked ❤️???' असं दिलंय फोटोला कॅप्शन.
यावेळी प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता, तर क्षितीजाने गुलाबी-पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.
याआधी प्रथमेश आणि क्षितीजाचा हळदी, मेहंदी समारंभ झाला.
हळदीला आणि मेहंदीला अनेक सेलिब्रिटीही उपस्थित होते.
व्हॅलेंटाइन्स डे च्या दिवशी प्रथमेश-क्षितीजाचा साखरपुडा पार पडला.
मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांचं शुभमंगल झालं.