राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज 65 वा वाढदिवस आहे 

आदिवासी गाव ते राष्ट्रपती भवनाचा त्यांचा प्रवास कसा होता, जाणून घ्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 ला ओडिशातील ऊपरबेडा येथे झाला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाच्या 15 व्या राष्ट्रपती आहेत.

त्या देशाला लाभलेल्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती असून पहिल्या आदिवासी राष्ट्रपतीही आहेत

राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी 1979 ते 1983 या काळात राज्य पाटबंधारे आणि विद्युत विभागात लिपिक म्हणून काम केले.

1994 ते 1997 पर्यंत अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन सेंटर, रायरंगपूर येथे शिक्षक म्हणून काम केले

2007 मध्ये ओडिशा विधानसभेने ‘सर्वोत्कृष्ट आमदार‘ म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित देखील केले आहे.

2015 ते 2021 पर्यंत झारखंडच्या 9व्या राज्यपाल म्हणून काम केले आहे