टेबलची उंची बदलते एका बटणावर! कसे काम करते Smart Desk?

Science Technology

21 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

नेमके काय आहे Smart Desk?

सतत एकाच जागी बसून काम केल्याने कंटाळा येतो? अशावेळी Smart Desk उपयोगी ठरते. हे एक खास टेबल असून, त्याची उंची गरजेनुसार कमी-जास्त करता येते.

Picture Credit: Pinterest

बटण दाबताच उंची कशी बदलते?

या टेबलमध्ये इलेक्ट्रिक मोटर आणि उंची बदलणारी यंत्रणा असते. कंट्रोल पॅनेलवरील बटण दाबल्यावर मोटर सुरू होते आणि टेबलचा वरचा भाग वर किंवा खाली सरकतो.

Picture Credit: Pinterest

बसून आणि उभे राहून काम

Smart Desk चा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकाच टेबलवर बसून किंवा उभे राहून काम करता येते. त्यामुळे काम करताना पोझिशन बदलण्याचा पर्याय मिळतो.

Picture Credit: Pinterest

उंची मॅन्युअलीही बदलता येते?

होय! काही मॉडेल्समध्ये हाताने फिरवायचे क्रँक हँडल असते. तर इलेक्ट्रिक मॉडेल्समध्ये बटण किंवा कंट्रोल पॅनेलच्या मदतीने उंची बदलता येते.

Picture Credit: Pinterest

मेमरी फंक्शनचा फायदा

काही Smart Desk मध्ये Memory Function दिलेले असते. यात तुम्हाला हवी असलेली उंची सेव्ह करता येते. त्यामुळे प्रत्येक वेळी टेबलची उंची पुन्हा सेट करण्याची गरज पडत नाही.

Picture Credit: Pinterest

Smart Desk खरेदी करताना काय पाहावे?

टेबलची उंची किती बदलते, मोटरचा आवाज, वजन पेलण्याची क्षमता आणि टेबलची स्थिरता तपासा. तसेच मोटर, कंट्रोल पॅनेल आणि वॉरंटीची माहितीही घ्या.

Picture Credit: Pinterest

प्रत्येकासाठी उपयोगी आहे का?

घरातून काम करणारे, ऑफिसमध्ये अनेक तास बसणारे आणि अभ्यास करणारे यांच्यासाठी Smart Desk उपयुक्त ठरू शकते. मात्र, केवळ टेबल बदलल्याने पाठदुखी टळेलच असे नाही.

Picture Credit: Pinterest

Smart Desk घ्यावे का?

काम करताना बसण्याची आणि उभे राहण्याची पोझिशन बदलायची असेल, तर Smart Desk चा विचार करू शकता. योग्य उंची आणि आरामदायी सेटअप निवडणे महत्त्वाचे आहे.

Picture Credit: Pinterest