Hero Destini 110 Classique Edition ची एक्स-शोरूम किंमत 76,400 रुपये आहे. ही एडिशन स्टँडर्ड VX व्हेरिएंटपेक्षा 1,400 रुपयांनी महाग आहे.
Picture Credit:heromotocorp
या Classique Edition मध्ये Aeris Brown Matt आणि Aqua Grey असे दोन रंगांचे पर्याय आहेत. या रंगांमुळे स्कूटरला आकर्षक आणि प्रीमियम लूक मिळतो.
Picture Credit:heromotocorp
या एडिशनमध्ये ड्युअल-टोन स्टायलिंग देण्यात आले आहे. बॉडीच्या रंगाशी कॉन्ट्रास्ट असणारे इनर पॅनल्स, कलर-मॅच्ड मिरर आणि साइड स्ट्राइप्स यामुळे स्कूटरचा लूक वेगळा दिसतो.
Picture Credit:heromotocorp
नवीन एडिशनमध्ये खास 3D एम्ब्लेम देण्यात आले आहे. त्यासोबत क्रोम डिटेलिंग आणि आकर्षक मिरर स्कूटरच्या क्लासिक स्टाइलमध्ये भर घालतात.
Picture Credit:heromotocorp
या स्कूटरमध्ये 110.9cc एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक इंजिन मिळते. हे इंजिन 7,250rpm वर 6kW म्हणजेच जवळपास 8.2hp पॉवर आणि 5,750rpm वर 8.7Nm टॉर्क निर्माण करते.
Picture Credit:heromotocorp
Hero च्या अधिकृत वेबसाइटनुसार Destini 110 चे मायलेज 56.2 kmpl असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष मायलेज रस्त्याची परिस्थिती आणि राइडिंग स्टाइलनुसार बदलू शकते.
Picture Credit:heromotocorp
Destini 110 मध्ये Projector LED Headlamp, मोठी आरामदायी सीट, 12-इंच अलॉय व्हील्स, मजबूत मेटल बॉडी आणि मोठे फ्लोअरबोर्ड मिळते. यामुळे रोजच्या प्रवासात उपयोगिता वाढते.
Picture Credit:heromotocorp
Classique Edition हे बेस VX व्हेरिएंटवर आधारित आहे. त्यामुळे यात पुढील बाजूला ड्रम ब्रेक मिळतो. टॉप ZX व्हेरिएंटमध्ये मात्र फ्रंट डिस्क ब्रेक दिला जातो. दोन्ही बाजूंना 12-इंच व्हील्स आहेत.
Picture Credit:heromotocorp
Hero Destini 110 Classique Edition कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहे. तसेच देशभरातील Hero शोरूममध्येही ही स्कूटर उपलब्ध आहे. नवीन लूक हवा असणाऱ्या ग्राहकांसाठी हा पर्याय ठरू शकतो.
Picture Credit:heromotocorp