आदि कैलास पर्वताचं उत्तराखंडमधून दर्शन घेणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 12 ऑक्टोबरला सकाळी आदि कैलास पर्वताचं दर्शन घेतलं.

मोदींनी उत्तराखंडच्या पिथौरागडमध्ये कैलास व्ह्यू पॉइंटवरून हे दर्शन घेतलं.

 मोदींनी ज्या व्ह्यू पॉइंटवरून आदि कैलासाचं दर्शन घेतलं तो पॉइंट जोलिंगकोंग भागात आहे.

भगवान शंकरांचं निवासस्थान मानलं जाणाऱ्या कैलास पर्वताचं दर्शन आता भारतातून  घेता येणार आहे. त्यासाठी चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटमध्ये जाण्याची गरज नाही.

 पिथौरागडच्या या व्ह्यू पॉइंटचं कैलास पर्वतापासूनच हवाई अंतर 50 किलोमीटर आहे. या ठिकाणापासून चीन 20 किलोमीटरवर आहे.

मोदींनी पार्वती कुंडाच्या जागी पूजा केली. त्यांनी शंख आणि डमरूदेखील वाजवला.

 त्यांनी नंदीचंही दर्शन घेतलं.

 नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत ज्यांनी भारत-चीन सीमेजवळ आदि कैलास पर्वताचं दर्शन घेतलं.