Published Feb 07, 2025
By Sayali Sasane
Pic Credit - Instagram
प्रियांका चोप्रा नेहमीच तिच्या लूक आणि अभिनयासह चर्चेत असते. अभिनेत्री नुकतेच भारतामध्ये भावाच्या लग्नासाठी परतली आहे.
अभिनेत्रीचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा लवकरच आता लग्नबंधनात अडकणार अजून, त्याच्या लग्नसोहळ्याची तयारी सुरु आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा लग्नसोहळ्यातील प्रत्येक लूक चर्चेत आले आहे. तिच्या फोटोवर चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.
अभिनेत्रीने भावाच्या लग्नाच्या संगीत कार्यक्रमात पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता ज्यावर कलरफुल नक्षीकाम केले होते.
तसेच अभिनेत्रीने लग्न सोहळ्यात निळ्या रंगाचा लेहंगा देखील परिधान केला होता. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
अभिनेत्री या लग्नसोहळ्यात वेगळ्याच अंदाजात दिसली. तसेच या सोहळ्यात ती भरपूर मज्जा आणि डान्स करताना नजर आली आहे.
अभिनेत्रीचे सोशल मीडियावरील फोटो पाहून आता चाहते प्रियांकाला चांगल्या प्रतिसाद देत आहेत.