कडक उन्हात बाहेर पडणं टाळा. बाहेर पडायचं असल्यास छत्री किंवा टोपी वापरा.सनग्लासेसचा घाला.
चहा आणि कॉफीचं सेवन कमी प्रमाणात करा.
कच्च्या आंब्याचा रस शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स पुनर्संचयित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
इलेक्ट्रोलाइट हे मीठ-पाणी आणि अनेक खजिनांचं मिश्रण आहे. त्यामुळे मीठ-पाण्याचे सेवन आवर्जून करा.
चहा-कॉफीऐवजी नारळ पाणी, फळांचा रस किंवा उसाचा रस प्या.
उन्हाळ्यात खूप घाम येतो, त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे शरीरातील पाण्याचा intake वाढवा.
कडक उन्हाळ्यात दही अतिशय गुणकारी आहे.
ताक पिणे उन्हाळ्यात कायम फायदेशीर आहे. उष्माघातावर उपचार करण्यासाठी ताक हा सर्वात चांगला घरगुती उपाय आहे.
लिंबू पाणी पिणे शरीरासाठी चांगले असते. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.