पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अपमान केल्याप्रकरणी खाटीक समाजा कडून निषेध

या कार्यक्रमाला भाजप-शिवसेनेचे खासदारही उपस्थित होते. 

या कार्यक्रमावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा तात्पुरत्या स्वरूपात हटवण्यात आल्याने सध्या विरोधक आक्रमक झाले आहेत.

याचा सर्वत्र निषेध व्यक्त करत आंदोलन करत असल्याचे दिसून येत आहेत. 

त्यातच आत्ता खाटीक समाज ही आक्रमक झाला असून त्यांनी देखील राज्य सरकारचा निषेध केला आहे. 

समाजसुधारक तसेच कर्तबगार महिला म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे पहिले जाते. आज महिला शिकून नोकरी व्यवसायात विविध पद भूषवत आहेत ते फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे.

तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देशभर पुण्यकर्म केले आहे. त्यामुळे दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील स्वा. सावरकर यांच्या जयंतीच्या वेळी पुतळे हटवणे योग्य नसल्याने महाराष्ट्रात सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.

दोन्ही पुतळे जाणून बुजून हटवून त्यांचा अपमान केल्याबद्दल ठाणे जिल्हा हिंदू खाटिक मागसवर्गीय सेवा समाज तर्फे संबधितांवर कारवाई करण्याचे निवेदन कल्याण तहसीलला देण्यात आले आहे.

सुधीर निकम, ठाणे जिल्हा हिंदू खाटीक मागासवर्गीय सेवा समाज