मीडियामध्ये चर्चेत असणाऱ्या राधे माँ मुलगा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.
राधे माँच्या या मुलाचे नाव हरजिंदर सिंह आहे. हरजिंदर ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. रणदीप हुडासोबत हरजिंदर दिसणार आहे.
हरजिंदर ज्या वेब सीरिजमध्ये एंट्री करणार आहे, त्याचे नाव 'इन्स्पेक्टर अविनाश' आहे. यात तो एसटीएफ अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
मीडियाशी बोलताना हरजिंदरने सांगितले की जर वेबसीरिज यशस्वी झाली नाही तर तो त्याचा फॅमिली बिझनेस सांभळणार आहे.
राधे माँचे खरे नाव सुखविंदर कौर आहे. ज्याचे लग्न वयाच्या 17 व्या वर्षी पंजाबचे रहिवासी मोहन सिंग यांच्याशी झाले होते.
राधे माँला दोन मुलगे आहेत, एकाचे नाव हरजिंदर सिंह आणि दुसऱ्याचे नाव भूपेंद्र सिंह आहे. आता राधे माँचा मोठा मुलगा हरजिंदर सिंग बॉलिवूडमध्ये दिसणार आहे.
'राधे माँ'च्या भक्तांची संख्या कमी नाही. एकेकाळी भक्त त्यांना दुर्गा देवीचा अवतार मानत होते.
आता हा राधे माँ चा मुलगा बॉलिवूडमध्ये काय कमाल दाखवतो पाहावं लागेल.