राजस्थानातील 'या' पॅलेसमध्ये परिणीति आणि राघव करणार लग्न

अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी 13 May 23 ला साखरपुडा केला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिणीति आणि राघव डेस्टिनेशन वेडिंग प्लान करत आहेत.

रिपोर्ट्सनुसार, परिणीति आणि राघव राजस्थानमध्ये शाही पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहेत.

रिपोर्ट्सनुसार, परिणीति शनिवारी उदयपूरला  पोहोचली आहे.

अभिनेत्रीने हॉटेल उदयविलासमध्ये कुटुंबासोबत जेवण केले, त्यानंतर ती लीला पॅलेसला रवाना झाली.

लग्नाचे ठिकाण पाहण्यासाठी  राघव जयपूरलाही जाऊ शकतो,  असे बोलले जात आहे.

28 मे पर्यंत उदयपूरमध्ये राहिल्यानंतर परिणीती जयपूरला जाणार आहे.

जर वृत्तांवर विश्वास ठेवला तर परिणीती आणि राघव ऑक्टोबर 2023 च्या अखेरीस लग्न करू शकतात.