परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांच्या लग्नाची फॅन खूप आतुरतेने वाट पाहत होते.
साखरपुडा झाल्यापासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. याबाबत एक अपडेट समोर आलेली आहे.
सप्टेंबर महिन्यात हे जोडपं लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. लग्न 25 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे.
परिणीती-राघवने राजस्थानला ड्रीम वेडिंग डेस्टिनेशन म्हणून निवडलं असल्याचंही म्हटलं जातंय.
राजस्थानमध्ये होणाऱ्या या भव्य लग्नात परिणीती आणि राघवचे कुटुंबीय सहभागी होणार आहेत.
अभिनेत्रीच्या टीमने लग्नाच्या तारखा आणि तपशीलांवर काम सुरू केल्याचं म्हटलं गेलं आहे. परिणीतीने याबाबत मौन बाळगले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार लग्नानंतर गुरुग्राममध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन होईल असं म्हटलं जात आहे.
मे महिन्यात परिणीती-राघव यांची एंगेजमेंट झाली होती.