डोक्यावर गमछा बांधत राहुल गांधी उतरले थेट शेतात
राहुल गांधी सध्या छत्तीसगढच्या दौऱ्यावर आहेत.
रविवारी त्यांनी रायपुरच्या कठिया गावात जाऊन धान्याची कापणी केली.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाददेखील साधला.
राहुल गांधी यांच्यासोबत यावेळी मुख्यमंत्री भूपेश बघेल, उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव, ताम्रध्वज साहू, अमरजीत भगत असे दिग्गज नेते उपस्थित होते.
काँग्रेस पार्टीमुळे इतर राज्यातील शेतकऱ्यांपेक्षा छत्तीसगढचे शेतकरी जास्त आनंदी आहेत,असं राहुल यांचं म्हणणं आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर शेतकऱ्यांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
राहुल गांधी यांनी शेतात जाताना शेतकरी बांधतात तसा गमछा डोक्यावर बांधला होता.
त्यांचे हे फोटो खूप व्हायरल झाले आहेत.