काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
केरळमधील वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवणार आहेत.
अर्ज दाखल करतेवेळी राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्रही सादर केलं.
यामध्ये राहुल गांधी यांनी एकूण संपत्ती 20 कोटी असल्याचं म्हटलं आहे.
राहुल गांधी यांच्याकडे 55 हजार रोख, 26 लाख बँक डिपॉझिट, शेअर मार्केटमध्ये 4.25 कोटींची गुंतवणूक
4 लाखांचे सोन्याचे दागिने, गुरुग्राममधील 9 कोटीचं कार्यालय
राहुल गांधी यांच्याकडे एकही कार नसल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.
येत्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी निवडून येतात का पाहया.