बिलासपूर ते रायपूर राहुल गांधींचा ट्रेनने प्रवास

काँग्रेस खासदार राहुल गांधी छत्तीसगड दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्यावेळी त्यांनी बिलासपूर ते रायपूर हा प्रवास इंटरसिटी एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचने केला.

राहुल गांधींच्या या रेल्वे प्रवासाचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.

त्यांनी या रेल्वेच्या प्रवासात लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.

या प्रवासादरम्यान एका प्रवाशाने त्यांना पेंटिग गिफ्ट दिलं. 

एका तरूणीने राहुल गांधी यांची सही घेतली.

यावेळी त्यांच्यासोबत ट्रेनमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल होते.

राहुल गांधींच्या या ट्रेनच्या प्रवासाची सध्या खूप चर्चा सुरु आहे.