डायबिटीजच्या रुग्णांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
डायबिटीज रुग्णांनी बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.
फळं खाताना नीट धुवून, स्वच्छ पुसून मग खावीत.
कितीही इच्छा झाली तरी पावसाळ्यात भिजणं टाळावं.
हायड्रेट राहण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या.
पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव अधिक असतो. हे टाळण्यासाठी अंग झाकणारे कपडे घालावेत.
पावसाळ्यात अधिक जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वं असणारे पदार्थ खावे. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
पावसाळ्यात पाय नेहमी स्वच्छ ठेवावेत. अन्यथा संसर्ग होऊ शकतो.