पावसाळ्यात केसांच्या आरोग्यासाठी भरपूर पाणी प्या, शरीर हायड्रेट ठेवा. 

रोजच्या रोज कोमट तेलाने टाळूला, आणि केसांना मसाज करा. 

पावसाळ्यात फॅशनेबल हेअरस्टाईल करण्याऐवजी बन, वेणी घाला. त्यामुळे केस खराब होणार नाहीत.

हेअर स्ट्रेटनर पावसाळ्यात वापरणं टाळा, त्यामुळे केसांचे आणखी नुकसान होऊ शकते. 

पावसाळ्यात वारंवार केस धुणे टाळा, त्यामुळे केसांना कोरडेपणा येतो.

अँटी-फ्रीज सीरम केस ओले असतानाच लावा त्यामुळे ते चांगले राहतील. 

केस नियमितपणे ट्रीम करा जेणेकरून केस Splittense होणार नाहीत. 

 पावसात भिजल्यानंतर केस आणि टाळू स्वच्छ धुवा. 

 केसांना डीप कंडिशनिंग मास्क लावा, हेअर ट्रीटमेंट घ्या. त्यामुळे केस निरोगी राहतील. 

केस विंचरताना सावकाश विंचरा जेणेकरून ते तुटणार नाहीत.