राज ठाकरेंनी अंबानींच्या घरच्या बाप्पाचं सहकुटुंब घेतलं दर्शन
मुकेश अंबानी यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे.
मुकेश अंबानींच्या घरच्या बाप्पाचं राज ठाकरेंनी सहकुटुंब दर्शन घेतलं.
मुकेश अंबानी यांनी स्वत: ठाकरे कुटुंबाचं स्वागत केलं.
राज ठाकरेंचा मुलगा अमितही पत्नीसह अंबानींच्या घरी आला होता.
मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानीही यावेळी पाहुण्यांचं स्वागत करताना दिसला.
मुकेश अंबानींचं घर असलेल्या अँटिलियामध्ये गणेशोत्सवासाठी खास तयारी करण्यात आली होती.
राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत मुकेश अंबानी यांनी फोटोही काढले.
ठाकरे आणि अंबानी कुटुंबाचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.